मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी आवश्यक तपासण्या – Dr.Ajit Golwilkar

मूत्रपिंड हा आपल्या शरीरातील फार महत्त्वाचा अवयव आहे. रक्तातील दूषित घटक बाहेर टाकणं हे मूत्रपिंडाचं प्रमुख काम. त्याबरोबरच रक्तदाब नियंत्रित करणं, शरीरातलं पाणी, ‘इलेक्ट्रोलाईट’ आणि ‘ड’ जीवनसत्त्व या घटकांवर लक्ष ठेवणं ही इतर कार्य देखील मूत्रपिंड करत असते. मूत्रपिंडाच्या आजाराचं निदान लवकर व अचूक होणं उपचारांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं.